चित्रप्रदर्शन आणि स्वर्ग

Published By: 
Dainik Gomantak
Dated On: 
21st Febuary 2023
चित्रप्रदर्शन आणि स्वर्ग

‘आपुण मेल्याबिगर स्वर्ग दिसना’ हे लोकप्रिय गोमंतकीय शिल्पकार आणि चित्रकार दामोदर मडगावकर यांच्या नवीन कला प्रदर्शनाचे नाव आहे. माजोर्डा येथील कार्पे दियेम आर्ट गॅलरीमध्ये २५ फेब्रुवारी २०२३ पासून या चित्रकला प्रदर्शनाला सुरुवात होत आहे. या प्रदर्शनामधल्या कलाकृतींचे वैशिष्ट्य म्हणजे, अनेक कोकणी वाकप्रचारांचा वापर करून, चित्रांदारे मानवी वर्तनांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न त्यात करण्यात आला आहे. दामोदर यांच्या चित्रकृतीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे 'हत्ती' या प्रतीकाचा त्यात होणारा प्रभावी वापर. दामोदरचा असा विश्‍वास आहे की या दोन प्रजातींमध्ये खूप सारे साम्य आहे. मिश्र माध्यम वापरून कागदावर निर्माण केलेल्या त्याच्या कलाकृती, विषयाची मांडणी तपशीलवार करतात, दैनंदिन मानवी निर्णय आणि वर्तन यांची ते आठवण करून देतात. १९ मार्चपर्यंत, बुधवार ते रविवार या दिवसात हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.

'आपुण पेल्याबगर स्वर्ग दिसना' (स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही) हा कोकणीतला एक सुंदर वाकप्रचार आहे. माझ्या मते, या जौवनाचा आनंद प्रत्येकाने पूर्णपणे उपभोगला पाहिजे. खरे म्हणजे, पृथ्वीशिवाय दुसरा स्वर्ग नाही. पृथ्वीवरचे आपले जीवन स्वगाँय बनवणे हे आपल्याच हातात आहे आणि त्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वत:च कष्ट उपसणे अनिवार्य आहे. मला वाटते, लोकांची समजूत असते की स्वर्ग हा पृथ्वीचा भाग नसून तो इतरत्र कुठेतरी आहे. पण॒ लोकांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही ती ही की शरीर आणि आत््याविना ते स्वर्गात काय करू शकतील? स्वर्गसुख मिळवण्यासाठी इथेच कष्ट करणे (मरणे) आपल्याला भाग आहे.

हत्ती या प्राण्याचे मला विलक्षण आकर्षण अशासाठी आहे की सर्व प्राण्यांमध्ये हत्तोच्या वर्तनाचा एक भाग असतोच. हौ गोष्टच माझ्या कलाकृतींमध्ये उतरवण्याचा माझा प्रयत्न असतो. अर्थात मौ अशीही अशा बाळगतो की लोकांनी माझ्या चित्रांचा अर्थ आपल्या परीने लावावा आणि त्याचा आनंद घ्यावा. मला लोकांचा प्रतिसाद समजून घेणे आवडते कारण त्यामुळे माझा स्वत:चा दृष्टिकोन व्यापक होतो. मौ सांगितल्याशिवाय प्रेक्षकांनी माझा विचारप्रक्रिया समजून घेतलेली मला आवडेल. कलाकृतींचे वेगवेगळे अन्वयार्थ कलाकृतीला समृद्ध बनवतात. माझ्या कलाकृती प्रेक्षकांसमोर नक्कीच वेगवेगळे प्रश्‍न उपस्थित करतोल. मौ लोकांचा हात पकडून माझ्या कलाकृतीसंबंधी उत्तरे द्यायचा प्रयत्न करणार नाही. त्यांना अर्थ लावायला मोकळे सोडणे मला आवडेल.